Weather Alert: नोव्हेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’च्या झळा, मराठवाड्यात विचित्र हवामान, रविवारी अवकाळी पाऊस
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यांत तुरळक पावसाचा अंदाज आहे.
advertisement
1/5

गेला आठवडाभर राज्यासह संपूर्ण मराठवाड्यात पाऊस पहायला मिळाला. आता मात्र नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दोन दिवसापासून मराठवाड्यात पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. दमट हवामानामुळे दुपारचा वेळी नागरिक घामाघूम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके सहन करावे लागत आहेत.
advertisement
2/5
कार्तिकी एकादशीच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परंतु कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा अलर्ट दिलेला नाही.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस वाटण्याची शक्यता आहे. वाढलेले तापमान आणि दमट हवामान यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. 5 ते 8 तारेखेच्या दरम्यान नांदेड जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
धाराशिव जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बीड, परभणी, जालना आणि हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस च्या आसपास तर तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस च्या दरम्यान राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: नोव्हेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’च्या झळा, मराठवाड्यात विचित्र हवामान, रविवारी अवकाळी पाऊस