Weather Alert: मराठवाड्यात शुक्रवारी पावसाचा धुमाकूळ, छ. संभाजीनगर, बीडसह 6 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Marathwada Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाड्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
1/5

महाराष्ट्रातील बहुतांश भागात गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यातील अनेक ठिकाणीही मुसळधार पाऊस झाला. आज 19 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर राहणार आहे. पुढील 24 तासांसाठी बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
हवामान विभागाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येथे दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेगही जास्त राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
3/5
लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. पुढील 4 दिवस या दोन्ही जिल्ह्यांत पावसाची हीच स्थिती राहणार असून यलो अलर्ट कायम राहील. शेतकरी वर्ग शेतीकामात गुंतलेला असताना हवामानातील बदल लक्षात घेऊन सावधगिरी बाळगने गरजेचे ठरते.
advertisement
4/5
परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. याठिकाणीही मुसळधार पावसासोबतच 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांत या जिल्ह्यांत पावसाचा जोर असून पुढील काही दिवस हवामानाच हीच स्थिती राहील.
advertisement
5/5
दरम्यान, नांदेड आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळता संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील 4 दिवसांपर्यंत पावसाचे प्रमाण राज्यभर वाढलेले राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यात शुक्रवारी पावसाचा धुमाकूळ, छ. संभाजीनगर, बीडसह 6 जिल्ह्यांना अलर्ट