TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : रेवाने विशालला दिली खास ऑफर; रुचितासोबत एका झटक्यात ब्रेकअप

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 मध्ये रेवा आणि संस्कृतीची वाईल्ड एंट्री झाल्यापासूनच रुचिताला विशालसोबत असलेल्या तिच्या नात्याबाबत असुरक्षितता वाटू लागली. आता तिची भीती खरी ठरताना दिसते आहे.
advertisement
1/7
Bigg Boss Marathi 6 : रेवाने विशालला दिली खास ऑफर; रुचिताशी एका झटक्यात ब्रेकअप
बिग बॉस मराठी 6 च्या घरात 3 वाइल्ड कार्ड सदस्यांची एंट्री होताच घरातील वातावरण पूर्णपणे बदललं आहे. विशाल आणि रुचिताच्या नात्यातही दुरावा आला आहे. सुरुवातीलाच मी रेवाला पटवणाऱ्या म्हणणाऱ्या विशालने रेवाने ऑफर दिली आणि विशालने रुचिताशी ब्रेकअपच केलं आहे.
advertisement
2/7
विशाल-रुचिता आणि विशाल-रेवा यांच्यातील संभाषणाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यावरून बिग बॉस मराठी 6 च्या घरातील रिलेशनशिपमध्येही मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे.
advertisement
3/7
रुचिता विशालला म्हणते, मला तू आवडतो तर आवडतो. यावर विशाल, "तुला वाटतं मी तुझ्या पाठी पाठी जबरदस्ती करावी", असं म्हणतो. रुचिता विशालला सांगते, ती माझी रिएक्शन होती. शेवटी विशाल, "नाही बोलायचं तुझ्याशी मला. तुझ्याशी बोललो तीच माझी सगळ्यात मोठी चूक आहे", असं म्हणत हात जोडतो.
advertisement
4/7
रुचिता तिथून उठून निघून जाते.  नंतर सागर आणि राखी रुचिताची समजूत घालताना दिसतात. राखी रुचिताला समजावत असतानाच तिला चक्कर येते. ती विशाल ती पडली असं ओरडताना ऐकून येतं.
advertisement
5/7
दुसरीकडे रेवा पॉवर कीसाठी विशालला मस्का लावताना दिसते. रेवा विशालला विचार, "तुला काही डील करायचं आहे का पॉवर की बद्दल? तू देणार आहेस प्रेमाने मला? तुझ्यावर खरंच मी विश्वास ठेवला आहे. तुला या घरात सगळ्यात जास्त काय महत्त्वाचं आहे.  काहीतरी असेल ना?"
advertisement
6/7
यावर विशाल आधी काहीच नाही अस म्हणतो. रेवा त्याला माझ्याकडे तुझ्यासाठी चांगली डील आहे, असं सांगते. यावर विशाल म्हणतो, "तू जा आणि झोप. मीपण झोपतो. उद्या सकाळी चांगल्या डीलबाबत विचार कर"
advertisement
7/7
दरम्यान याआधीच विशालने आपण रेवाला पटवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यात आता त्यांचं ब्रेकअप झालं आहे. त्यामुळे आता घरात नेमकं काय घडणार हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : रेवाने विशालला दिली खास ऑफर; रुचितासोबत एका झटक्यात ब्रेकअप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल