Weather Alert: जाता जाता झोडपणार, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट, 48 तास धोक्याचे!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मराठवाड्यत आज पुन्हा दोन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/5

महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत असून आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर ओसरला आहे. मराठवाड्यात मात्र वेगळेच चित्र असून तुरळख ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होत आहे. आज पुन्हा मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने लातूर आणि धाराशिवला यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना हवामान विभागाने मंगळवारी यलो अलर्ट दिला होता. आज मात्र या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून कोणताही महत्त्वाचा इशारा दिलेला नाही. गुरुवारपासून या दोन्ही जिल्ह्यांतील पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/5
मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाने झोडपले. आता या ठिकाणी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील 48 तासांसाठी या दोन्ही जिल्ह्यांना सतर्कतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा अंदाज आहे.
advertisement
4/5
परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या 4 जिल्ह्यांत देखील पुढील 2 दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने कोणताही महत्त्वाचा अलर्ट दिला नसला तरी पुढील 48 तास विजांसह हलका ते मध्यम पाऊस होईल. त्यानंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
दरम्यान, मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. दुष्काळी मराठवाड्यत सप्टेंबरमध्ये विक्रमी पाऊस झाला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. आता पावसाचा जोर ओसरल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु, पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: जाता जाता झोडपणार, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट, 48 तास धोक्याचे!