TRENDING:

Marathwada Rain: मराठवाड्यात वारं फिरलं, संभाजीनगरसह 3 जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा, 24 तास कोसळणार

Last Updated:
मराठवाड्याला देण्यात आला आहे येल्लो अलर्ट Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांसाठी छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यात वारं फिरलं, संभाजीनगरसह 3 जिल्ह्यांत वादळी पाऊस, 24 तास कोसळणार
जून महिना सुरू झाल्यापासून मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. परंतु, आता मराठवाड्यात पावसासाठी पोषक हवामान झाले आहे. छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यांना आज हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तसेच काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या तीनही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. पण आता पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रमाणे वारे वाहतील.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर शहरात देखील आज जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. शहरामध्ये गुरुवारी 3.7 मिमी पावसाची नोंद झाली. आज ताशी ते 30 ते 40 किलोमीटर प्रमाणे वारे वाहतील. तर तापमान 30 अंशांवर राहील. पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि जालना या ठिकाणी देखील आज हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. परंतु, या जिल्ह्यांना कोणताही महत्त्वाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. 7 मेपासून या जिल्ह्यांत पुन्हा वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, मराठवाड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसत आहे. मे महिन्यात झालेल्या वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाच्या कामांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: मराठवाड्यात वारं फिरलं, संभाजीनगरसह 3 जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा, 24 तास कोसळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल