Marathwada Weather: मराठवाड्यात उन्हाचा तडाखा, 11 ते 4 घरीच थांबा, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Weather Alert: मराठवाड्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. आज तापमानाचा पारा 41 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
1/5

राज्यात तापमानात मोठी वाढ झाली असून मराठवाड्यात देखील 16 आणि 17 एप्रिलला तापमानात लक्षणीय वाढ झालीये. उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे नागरिकांना उष्णतेचा तडाखा सहन करावा लागत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या दोन दिवसांत मराठवाड्यातील कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाऊ शकते.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अधिक तीव्र असेल. 16 एप्रिल रोजी मराठवाड्यातील बहुतांश भागांत कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस राहिले. तर काही ठिकाणी ते 40 अंशांवर पोहोचले. ढगाळ हवामानाचा अभाव आणि कोरड्या वाऱ्यांमुळे दुपारच्या वेळी उष्णता अधिक जाणवली.
advertisement
3/5
आज 17 एप्रिल रोजीही तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांना दुपारी 11 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव आणि उच्च दाबाचे क्षेत्र यामुळे तापमानात वाढ होत आहे. याचा परिणाम शेती आणि दैनंदिन जीवनावरही होत आहे.
advertisement
4/5
शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तर नागरिकांना पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे घालणे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.
advertisement
5/5
हवामान खात्याने पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक प्रशासनानेही उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा सज्ज ठेवल्या आहेत. मराठवाड्यातील जनतेने हवामानाच्या या आव्हानात्मक परिस्थितीत सतर्क राहणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather: मराठवाड्यात उन्हाचा तडाखा, 11 ते 4 घरीच थांबा, हवामान विभागाचा अलर्ट