TRENDING:

आजचं हवामान: ताशी 50 किमीने वारे वाहणार, विजा कडाडणार, पण मराठवाड्यात पाऊस कुठं होणार?

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा मोठ्या बदलांची शक्यता आहे. आज 4 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5
आजचं हवामान: 50 किमीने वारे वाहणार, विजा कडाडणार, मराठवाड्यात पाऊस कुठं होणार?
मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. अशातच हवामानात पुन्हा बदल जाणवत असून गुरुवारी जालना आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये हलका पाऊस झाला. आज देखील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आज, 20 जून रोजी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव या चार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
4/5
मराठवाड्यात मागील अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी आभाळाकडे आशेने पाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून काही शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. आता पुन्हा पावसाचा इशारा असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
advertisement
5/5
दरम्यान, मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कमीच राहणार आहे. 21 जूनपासून काही दिवस मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आजचं हवामान: ताशी 50 किमीने वारे वाहणार, विजा कडाडणार, पण मराठवाड्यात पाऊस कुठं होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल