Rain Alert: मराठवाड्यात पुन्हा अस्मानी संकट; बीड, नांदेडला ऑरेंज अलर्ट, छ. संभाजीनगरमध्ये काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Marathwada Rain: गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात वादळी पावसाने मराठवाड्याला झोडपले आहे. आज पुन्हा हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
1/4

परभणी, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहतील.
advertisement
2/4
छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील 40 ते 50 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे राहतील. विजांच्या कडकडाटात या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
3/4
मराठवाड्यातील तापमानामध्ये घट झालेली आहे. सध्या सर्व जिल्ह्यात कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस एवढंच आहे. संभाजीनगर शहरांमध्ये देखील सोमवारी पावसाने हजेरी लावली होती. आज देखील शहरामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून दिवसभर वातावरण ढगाळ राहील.
advertisement
4/4
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Rain Alert: मराठवाड्यात पुन्हा अस्मानी संकट; बीड, नांदेडला ऑरेंज अलर्ट, छ. संभाजीनगरमध्ये काय स्थिती?