Marathwada Weather: काळजी घ्या! मराठवाडा होरपळणार, 48 तास धोक्याचे, संभाजीनगरसह या जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Weather: मराठवाड्यात उष्णतेची लाट असून तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. पुढील 2 दिवस तापमानात मोठी वाढ होणार असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
1/5

एप्रिलच्या मध्यावर राज्यातील बहुतांश भागात सूर्यदेव कोपल्याचे चित्र आहे. मराठवाडा विभागात तापमानात मोठी वाढ झालीये. उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे नागरिकांना उष्णतेचा तडाखा सहन करावा लागत आहे.
advertisement
2/5
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत मराठवाड्यातील कमाल तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाऊ शकते.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर किमान तापमान हे 26 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर कमाल तपामान हे 42 अंश सेल्सिअस एवढे असेल. संभाजीनगर शहरामध्ये एप्रिल महिन्यातील सगळ्यात उच्चांकी तापमान नोंदवले गेलेय.
advertisement
4/5
जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र असेल. मराठवाड्यातील बहुतांश भागांत कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. त्यामुळे नागरिकांना दुपारी 11 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
5/5
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना टोपी, छत्री घेऊन बाहेर पडावे. ज्येष्ठ नागरिक आणि मुलांची विशेष काळजी घ्यावी, शेतकऱ्यांनी देखील भर उन्हात काम करणे टाळावे, असं आवाहन करण्यात आलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather: काळजी घ्या! मराठवाडा होरपळणार, 48 तास धोक्याचे, संभाजीनगरसह या जिल्ह्यांना अलर्ट