TRENDING:

Marathwada Weather: सतर्क राहा! ताशी 50 किमी वेगाने वारे वाहणार, पाऊस कोसळणार, मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
1/5
ताशी 50 किमी वेगाने वारे वाहणार, पाऊस कोसळणार, मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना अलर्ट
जूनमध्ये मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर ओसरला. मात्र, आता पुन्हा काही भागात पाऊस सक्रिय झाला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रमाणे वारे वाहतील. तसेच इथल्या नागरिकांनी सतर्क राहावे. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि परभणी या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अलर्ट हा देण्यात आला नाही. या ठिकाणी तापमानात मोठी वाढ बघायला मिळत आहे.
advertisement
3/5
लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना देखील हवामान खात्याकडून आज कोणत्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाही आहे. या ठिकाणी देखील हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. तसेच आज देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगरशहरामध्ये देखील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आज शहरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. शहरातील तापमानात मोठी वाढ झालेली आहे. शहरामध्ये तापमान हे 34 अंशवरती पोहोचलेले आहे.
advertisement
5/5
तापमानात वाढ झाल्यामुळे सध्या नागरिक गर्मीमुळे हैराण झाले आहेत. मराठवाड्यातील काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. त्या ठिकाणी शेतकरी पेरणी करत आहेत. पण शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन पेरणी करावी. तसेच नागरिकांना देखील आपले आरोग्य जपावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather: सतर्क राहा! ताशी 50 किमी वेगाने वारे वाहणार, पाऊस कोसळणार, मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल