TRENDING:

Bigg Boss Marathi 6 च्या घरात नियमांना फाटा आणि मनमानी कारभार, 5 सदस्यांना महागात! रितेशभाऊंनी दिला मोठा धक्का

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरात भाऊचा धक्क्याचा दिवस आला की बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार, कॅप्टन कोण होणार याची उत्सुकता असते. पण यासोबतच आता रितेश भाऊने आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
advertisement
1/5
'बिग बॉस मराठी 6' च्या घरात नियमांना फाटा आणि मनमानी कारभार, 5 सदस्यांना महागात
'हे बिग बॉसचं घर आहे, इथं मस्तीत नाही शिस्तीत राहायचं', असं रितेश देशमुख बिग बॉस मराठी 6 मध्ये भाऊच्या धक्क्यावर वारंवार बजावत आला आहे. तरी बिग बॉसच्या घरातील सदस्य काही ऐकेनात. त्यांनी सतत नियमांचा भंग केला आणि आपला मनमानी कारभार केला. आता मात्र रितेशभाऊंनी त्यांना चांगलाच धक्का दिला आहे.
advertisement
2/5
बिग बॉस मराठी 6 च्या घरात वारंवार नियमभंग करणाऱ्या 5 सदस्यांना मोठी शिक्षा मिळाली आहे. पुढील आठवड्याची कॅप्टन पदाची दावेदारी आणि त्यासोबत येणारी इम्युनिटी काढून घेण्यात आली आहे. आता हे 5 सदस्य कोण तर राकेश बापट, रुचिता जामदार, दीपाली सय्यद, सोनाली राऊत आणि प्रभू शेळके यांचा यात समावेश आहे.
advertisement
3/5
तसंच दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत, रुचिता जामदार हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. तर 'शेणाचं दार की मेणाचं दार' या कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमध्ये सोनाली राऊतनं सहभागी होण्यास चक्क नकार दिल्याने बिग बॉसनं तिला थेट नॉमिनेट केलं.
advertisement
4/5
सोनालीच्या या वागण्यावर रितेशनं 'भाऊच्या धक्क्या'वर तिची चांगलीच शाळा घेतली. 'तुम्ही इथं पिकनिकला आला आहात का? हा ऍटिट्यूड तुमच्या घरी ठेवायचा या घरात नाही. इथं आला आहात तर टास्क खेळावाच लागेल." असं रितेशनं बजावलं.
advertisement
5/5
सोशल मीडियावरील ट्रेंडनुसार प्रभू शेळके आणि ओमकार राऊत यांना प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. तर प्राजक्ता शुक्रे, दिपाली सय्यद या स्पर्धकांना म्हणावा तसा पाठिंबा मिळताना दिसत नाहीये. त्यामुळं रितेश देशमुखच्या 'भाऊचा धक्का' मध्ये या रविवारी नक्की कोण बाहेर पडणार, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोनाली राऊतच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.  सोनाली राऊत घरातून आऊट झाल्या असल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 च्या घरात नियमांना फाटा आणि मनमानी कारभार, 5 सदस्यांना महागात! रितेशभाऊंनी दिला मोठा धक्का
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल