TRENDING:

Marathwada Rain : मराठवाड्यात हवापालट, पाऊस पुन्हा झोडपणार, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
मराठवाड्यात आज 4 ऑगस्ट रोजी 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/7
मराठवाड्यात हवापालट, पाऊस पुन्हा झोडपणार, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आकाशावर ढग दाटून येत आहेत. मराठवाड्यात आज 4 ऑगस्ट रोजी 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
advertisement
2/7
तर उर्वरित 5 जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसासह विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
3/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच ढगाळ आणि दमट वातावरण असू शकते. तसेच जालना देखील हलका पाऊस असण्याची चिन्हे वर्तवण्यात येत आहेत. तर परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच ढगाळ आणि दमट वातावरण असू शकते. तसेच जालना देखील हलका पाऊस असण्याची चिन्हे वर्तवण्यात येत आहेत. तर परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
नांदेड, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांना सतर्कतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे असून येथील नागरिकांनी खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, या 5 जिल्ह्यांना कोणताही सतर्कतेचा अलर्ट हवामान विभागाने दिला नाही. मात्र हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समाधानकारक पावसाची येथील शेतकरी आतुरतेने वाट पाहत असून शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.
advertisement
6/7
वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक झालेल्या पावसात कांदा मार्केटमधील शेतकऱ्यांचा कांदा भिजला. उघड्यावर पडलेला आणि वाहनांत आणलेला खुला कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. वैजापूर बाजार समितीच्या आवारात नेहमीप्रमाणे शनिवारीही सुमारे 600 वाहनांतून शेतकऱ्यांचा कांदा विक्रीस आला होता. सकाळच्या सत्रात जवळपास 400 वाहनांचा लिलाव झाला. त्यानंतर दुपारनंतर दुसऱ्या सत्रात 4:30 ला कांदा लिलाव सुरू झाला; मात्र, पाच वाजेच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांची एकच धांदल उडाली. या पावसामुळे कांदा भिजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
advertisement
7/7
काही दिवस पावसाचे प्रमाण कमी झाले होते मात्र, आता हवामानात बदल जाणवत असल्याने पावसाची वारे पलटले आहेत. पुढील काही दिवस अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी योग्य ते पिकासंदर्भात वेळेचे नियोजन करावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain : मराठवाड्यात हवापालट, पाऊस पुन्हा झोडपणार, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल