"चोर ओटीचं डेकोरेशन..." कुणालच्या एका वाक्याने सोशल मीडियावर धुमाकूळ; कोकण हार्टेड गर्ल खरंच देणार गुड न्यूज?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ankita Walawalkar: फेब्रुवारी २०२५ मध्ये कुणालसोबत संसार थाटणाऱ्या अंकिताने सासरी पहिली संक्रांत दणक्यात साजरी केली खरी, पण सेलिब्रेशनच्या एका व्हिडिओने मात्र चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.
advertisement
1/8

मुंबई: कोकणची अस्सल माती आणि तिथला रांगडा स्वभाव सोशल मीडियावर पोहोचवणारी अंकिता प्रभू वालावलकर सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
advertisement
2/8
निमित्त होतं लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीचं, पण गप्पा रंगल्यात त्या एका 'गोड बातमी'च्या! फेब्रुवारी २०२५ मध्ये कुणालसोबत संसार थाटणाऱ्या अंकिताने सासरी पहिली संक्रांत दणक्यात साजरी केली खरी, पण सेलिब्रेशनच्या एका व्हिडिओने मात्र चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.
advertisement
3/8
अंकिताने आपल्या सासूबाईंच्या इच्छेखातर यंदाची संक्रांत सासरच्या गावी साजरी केली. घराबाहेर 'अंकिता व कुणालची पहिली मकर संक्रांत' असा मोठा बोर्ड लावून तिने गावजेवणासारखाच एक मोठा थाट मांडला होता.
advertisement
4/8
या कार्यक्रमासाठी अंकिताने साडीऐवजी काळ्या रंगाचा लेहेंगा आणि हलव्याचे पारंपरिक दागिने परिधान केले होते. गावच्या तब्बल ३५० महिलांना तिने हळदी-कुंकवासाठी आमंत्रित केलं होतं.
advertisement
5/8
खरा ड्रामा सुरू झाला तो अंकिताने कुणालसोबत शेअर केलेल्या एका रीलमुळे. अंकिताला इव्हेंट मॅनेजमेंटची आणि सगळं काम परफेक्ट करण्याची सवय आहे. व्हिडिओमध्ये ती कुणालला म्हणते, "बघ कुणाल, मी आधीच सांगितलंय की मी ऑर्गनाइझ केलेला हा शेवटचा इव्हेंट असेल, यापुढे मी काही करणार नाही." त्यावर कुणाल हसत उत्तर देतो, "'चोर ओटी'चा इव्हेंट मात्र मीच प्लॅन करणार आहे."
advertisement
6/8
पण अंकिता इथेच थांबली नाही, तिने कमरेवर हात ठेवून एका गरोदर महिलेसारखी चालत दाखवलं आणि म्हणाली, "मला तेच हवंय. नाहीतर माझ्या डोहाळे जेवणाला सुद्धा मीच सांगत बसेन की तिथे फुलं लावा आणि इथे डेकोरेशन करा." अंकिताने ज्या पद्धतीने 'डोहाळे जेवण' आणि 'चोर ओटी' या शब्दांचा वापर केला आणि त्यासोबत दिलेले हावभाव पाहून नेटकऱ्यांनी तर्क लावायला सुरुवात केली आहे.
advertisement
7/8
हा व्हिडिओ पोस्ट होताच कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. "अंकिता, तू आम्हाला हे हिंट्स देतेयस का?", "कोकण हार्टेड गर्ल आता आई होणार का?", अशा प्रश्नांनी तिचं इनबॉक्स भरलं आहे.
advertisement
8/8
अंकिताने थेटपणे तिच्या गरोदरपणाबद्दल काहीही म्हटलं नसलं, तरी तिच्या बोलण्याच्या ओघात आलेले हे शब्द तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी 'गुड न्यूज' मानली जात आहे. अंकिताची ही 'संक्रांत' खरोखरच तिच्या आयुष्यात गोडवा घेऊन येणार का, याची आता सगळ्यांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
"चोर ओटीचं डेकोरेशन..." कुणालच्या एका वाक्याने सोशल मीडियावर धुमाकूळ; कोकण हार्टेड गर्ल खरंच देणार गुड न्यूज?