PM मोदींना स्किन केअर रूटीन विचारणाऱ्या खेळाडूने मॅच फिरवली, मुंबईच्या हाता तोंडाशी आलेला विजय खेचून आणला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
डब्ल्युपीएलमध्ये आज युपी वॉरियर्सने बलाढ्य मुंबई इंडियन्सचा 7 विकेटने पराभव केला आहे. या विजयासह युपीने आपला पहिला विजय मिळवला तर मुंबई इंडियन्सची होणारी विजय हॅट्ट्रीक हुकवली आहे.
advertisement
1/7

खरं तर युपी वॉरियर्स समोर 161 धावांचे लक्ष्य होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना युपीची सुरूवात चांगली झाली नव्हती.
advertisement
2/7
खरं तर युपी वॉरियर्स समोर 161 धावांचे लक्ष्य होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना युपीची सुरूवात चांगली झाली नव्हती.
advertisement
3/7
युपीकडून सलामीला उतरलेल्या कर्णधार मॅग लेनिंग 25 तर किरण नवगिरेने फक्त 10 धावा केल्या होत्या.त्यानंतर फोईब लिचफिल्डने आणि हरलीन देओलने युपी वॉरियर्सचा डाव सावरला होता.
advertisement
4/7
त्यानंतर एकट्या हरलीन देओलने 64 धावांची वादळी खेळी करून हे लक्ष्य गाठत युपीला त्यांचा पहिला सामना जिंकवून दिल. ही तिच खेळाडू आहे जिने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन यांना स्किन केअर रुटींग विचारला होता.
advertisement
5/7
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमावून 161 धावा ठोकल्या होत्या. मुंबईकडून नॅट सिव्हर ब्रंटने 65 धावांची सर्वाधिक वादळी खेळी केली होती.
advertisement
6/7
अमनज्योत कौरने 38 आणि निकोला कॅरेने 32 धावा केल्या होत्या. या धावांच्या बळावर मुंबईने 161 धावा केल्या आहेत.
advertisement
7/7
युपी वॉरियर्सकडून शिखा पांडे, दिप्ती शर्मा,सोफी अॅसलेटन आणि आशा शोभना जॉयने प्रत्येकी एक विकेट घेतली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PM मोदींना स्किन केअर रूटीन विचारणाऱ्या खेळाडूने मॅच फिरवली, मुंबईच्या हाता तोंडाशी आलेला विजय खेचून आणला