TRENDING:

Weather Alert: पाऊस, थंडी की उन्हाचे चटके, मराठवाड्याला रविवारी कोणता अलर्ट? पाहा हवामान अपडेट

Last Updated:
Weather update: महाराष्ट्रासह मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. छत्रपती संभाजीनगर ते बीड आठही जिल्ह्यांचं आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
पाऊस, थंडी की उन्हाचे चटके, मराठवाड्याला रविवारी कोणता अलर्ट? पाहा हवामान अपडेट
राज्यासह मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. नोव्हेंबर अखेर पुन्हा हवापालट झाली असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील तापमानात वाढ झाली. मात्र थंडीचा अनुभव कायम आहे. आज 23 नोव्हेंबर रोजी मराठाड्यातील छत्रपती संभाजीनरसह आठही जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच काही प्रमाणात गारठा जाणवेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके राहू शकते.
advertisement
3/5
बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज वातावरण कोरडे राहणार आहे. तसेच आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज असून, सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी थंडीची तीव्रता जास्त जाणवेल. दिवसभर मात्र गारठा कमी राहणार असून तापमानाचा पारा 32 अंशांवर जाईल. तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके राहू शकते.
advertisement
4/5
उर्वरित लातूर व धाराशिव या भागातही दिवसभर कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी गारठा कायम असून लातूरमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहू शकते.
advertisement
5/5
दरम्यान, आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परंतु, मराठवाडा विभागातील सर्व आठ जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. तसेच कोणताही सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आला नाही. साधारणतः सगळीकडे कोरडे वातावरण असणार आहे. परंतु, थंडीचा विचार करता नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: पाऊस, थंडी की उन्हाचे चटके, मराठवाड्याला रविवारी कोणता अलर्ट? पाहा हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल