TRENDING:

आजचं हवामान: वादळी पाऊस पुन्हा झोडपणार, छ. संभाजीनगर, जालन्याला यलो अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. छत्रपती संभाजीनगरसह जालन्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
आजचं हवामान: वादळी पाऊस पुन्हा झोडपणार, छ. संभाजीनगर, जालन्याला यलो अलर्ट
यंदा राज्यात मे महिन्यातच मान्सून दाखल झाला. पण जून महिना सुरू झाल्यापासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मराठवाड्यामध्ये देखील जून महिन्यापासून पावसाने उघडीप दिलीये. 4 जून रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. आज शहरात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. संभाजीनगरमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रमाणे वारे वाहतील.
advertisement
3/5
जालना जिल्ह्याला देखील हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मे महिन्यात झालेल्या वादळी पावसाने जालन्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा पावसाचा अलर्ट दिल्याने शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
4/5
हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या ठिकाणी देखील मध्यम ते हलका स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी कोणताही महत्त्वाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये तापमानामध्ये पुन्हा वाढ झाली असून पारा 33 अंशावरती आहे.
advertisement
5/5
लातूर, परभणी आणि बीड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या ठिकाणी देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतातील शेतात मशागतींच्या कामाला वेग आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आजचं हवामान: वादळी पाऊस पुन्हा झोडपणार, छ. संभाजीनगर, जालन्याला यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल