आजचं हवामान: मराठवाड्यावर पुन्हा संकट, आठच दिवसांत नवा रेकॉर्ड, 11 अंशांनी घसरला पारा
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Weather update: मराठवाड्यातील हवामानात अचानक मोठे बदल जाणवत आहेत. तापमानाचा पारा 8 दिवसांत 11 अंशांनी घसरला आहे.
advertisement
1/5

गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. अवकाळी पावसाचं संकट टळलं असून हिवाळा सुरू झाला आहे. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात तापमानात घट होत असून थंडीचा कडाका वाढत आहे. मराठवाड्यात तापमानाचा पारा 12 अंशांपर्यंत घसरला आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मागील तीन ते चार दिवसाासून मराठवाड्यात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान आहे. किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शेकोट्या पेटल्या असून थंडीची तीव्रता वाढली आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर शहरात थंडीचा जोर वाढला आहे. सोमवारी किमान तापमान 11.8 अंशांपर्यंत खाली आलं होतं. आज मंगळवारी देखील तापमानाची हीच स्थिती राहणार आहे. गेल्या 8 दिवसांत तापमानात 11 अंशांची घट झाली आहे.
advertisement
4/5
गेल्या आठवडाभरापासून मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत देखील तापमानात रोज घट होत आहे. आज नांदेड आणि बीडमध्ये 12 अंश तर परभणीत 13 आणि धाराशिवमध्ये 14 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान राहील.
advertisement
5/5
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान घसरण्याचा यंदा नवा विक्रम झाला आहे. 2 नोव्हेंबर रोजी छ. संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 32 तर किमान 22 अंश सेल्सिअस होते. 10 नोव्हेंबर रोजी कमाल तापमान 29.4 अंश, तर किमान 11.8 अंशांपर्यंत घसरले. आठच दिवसांत हवामानात मोठे बदल झाल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आजचं हवामान: मराठवाड्यावर पुन्हा संकट, आठच दिवसांत नवा रेकॉर्ड, 11 अंशांनी घसरला पारा