मराठवाड्यात याठिकाणी होणार पाऊस, शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी, महत्त्वाची माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस झाला आहे. मात्र, मागील 2 दिवसांपासून शहरात पावसाने दडी मारली आहे. मात्र, आगामी काळात हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. 2 दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे शहरामध्ये उन्हाचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे सध्याला पाऊस पडण्याची अत्यंत गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा. (अपूर्व तळणीकर/छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)
advertisement
1/4

मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, लातूर,धाराशिव आणि बीड याठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये ज्या भुईमुगाच्या शेंगा लावलेल्या आहेत, त्या शेंगा काढून घ्याव्यात आणि त्यांची विशेष काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
advertisement
2/4
मोसंबीच्या बागांचीही जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासोबतच हरभरा पिकाचीही काळजी घ्यावी. जर तुमचा हरभरा पिक काढणीला आला असेल तर तो काढून घ्यावा आणि सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यावा, असे सांगण्यात आले आहे.
advertisement
3/4
मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव आणि जालन्यात पाऊस सांगितला गेलेला आहे. पण काही ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून पाऊस नाही. तर त्याठिकाणी पाऊस होईल, असेदेखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. पावसाचा खंड पडल्याने उन्हाचा कडाका जाणवत आहे.
advertisement
4/4
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता सांगितली आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर काही ठिकाणी तूरळक प्रमाणामध्ये पाऊस होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात याठिकाणी होणार पाऊस, शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी, महत्त्वाची माहिती