TRENDING:

Marathwada Weather: मराठवाड्यात उष्णतेचा कहर, 11 ते 4 घरातच थांबा, हवामान विभागाचा इशारा

Last Updated:
Marathwada Weather: मराठवाड्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही ठिकाणी उष्णतेचा पारा 44 अंशांपर्यंत गेला आहे.  
advertisement
1/5
मराठवाड्यात उष्णतेचा कहर, 11 ते 4 घरातच थांबा, हवामान विभागाचा इशारा
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असून बहुतांश ठिकाणी उष्णतेचा पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. मराठवाड्यात देखील हीच स्थिती कायम आहे. पुढील काही दिवसांत उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान एप्रिलमधील उच्चांकी 42 अंशांवर गेलं आहे. आज देखील कमाल तापमान 42 तर किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
बीड आणि हिंगोलीमध्ये देखील तापमानाचा पारा 42 अंशांवर राहणार आहे. तर जालन्यात 40 अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांत देखील तापमानात सातत्याने वाढ होत आहे.
advertisement
4/5
परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान हे 44 अंश सेल्सिअस असेल. या दोन जिल्ह्यांमध्ये देखील एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणामध्ये तापमानात वाढ झालेली आहे.
advertisement
5/5
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे टाळावे. ज्येष्ठ नागरिकांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यासोबत शेतकऱ्यांना देखील शेतातील कामे दुपारच्या वेळी करणे टाळावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather: मराठवाड्यात उष्णतेचा कहर, 11 ते 4 घरातच थांबा, हवामान विभागाचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल