Weather Alert: मराठवाड्यावर अवकाळी संकट, संभाजीनगरसह या जिल्ह्यांना अलर्ट, पाहा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Weather: मराठवाड्यातील तापमानात एप्रिलअखेर मोठे बदल जाणवत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
1/5

एप्रिलअखेर मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी ढगाळ हवामान अशी स्थिती आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यांना हवामान विभागाने महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. पुढील 24 तासांच्या हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवड्यातील काही भागात दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. धाराशीव, नांदेड जिल्ह्यातील काही भागात आज विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यात आज आणि उद्या उष्ण तसेच दमट हवामानाचा अंदाज आहे.
advertisement
3/5
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यामध्ये सध्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून कमाल तापमान 44 अंशांवर गेलंय. तर 25 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान नोंदवलं गेलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज किमान तापमान 25 अंश तर कमाल 40 अंश सेल्सिअस एवढे असेल.
advertisement
4/5
छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये शनिवारी ढगाळ वातावरण होते. आज देखील हवामान ढगाळ राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यातील जालना येथे कमाल तापमान 40 अंश, हिंगोलीत 39 अंश सेल्सिअस राहील. काही भागात ढगाळ हवामान राहणार असून शेतकऱ्यांना आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यावर अवकाळी संकट, संभाजीनगरसह या जिल्ह्यांना अलर्ट, पाहा हवामान अंदाज