परतीच्या पावसाचा धुमाकूळ! मराठवाड्याला पुन्हा झोडपणार, या जिल्ह्यांना रेड अलर्ट
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालत असतानाच मराठवाड्यातही धो धो सुरूच आहे. आज मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय.
advertisement
1/5

राज्यात परतीच्या मान्सूनने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातही गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा एकदा मराठवाड्यासाठी हवामान विभागाने महत्त्वाचा अलर्ट दिला आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील , जालना, बीड या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय.
advertisement
3/5
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि शेतकऱ्यांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल. सध्या सोयाबीन पीक काढणीला आले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनचा चिखल झाल्याचे चित्र आहे. तसेच फळबागांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेय.
advertisement
4/5
पैठण येथील जायकवाडी धरणांमधून गेट क्र. 11, 26, 13, 24, 15, 22, 17, 20 असे एकूण 8 गेटस 0.5 फुट उंचीवरुन 1 फुट उंचीवर उघडण्यात आले आहेत. तर गेट क्र. 10 व 27 हे 2 गेटस 1 फुट उंचीवरुन 1.5 फुट उंचीवर उघडून 5240 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय.
advertisement
5/5
सध्या जायकवाडी धरणाच्या 18 गेटमधुन 19 हजार 912 क्युसेक विसर्ग सुरू राहील. पाण्याची आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. त्यामुळे नदी काठच्या 400 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! मराठवाड्याला पुन्हा झोडपणार, या जिल्ह्यांना रेड अलर्ट