TRENDING:

Weather Alert: श्रावणाच्या पहिल्याच दिवशी अलर्ट, मराठवाड्यात पावसाचा जोर, 25 जुलैचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात श्रावण महिन्याची सुरुवात जोरदार पावसाने होत आहे. पुढील 48 तासांसाठी 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
श्रावणाच्या पहिल्या दिवशी अलर्ट, मराठवाड्यात पावसाचा जोर, 25 जुलैचा हवामान अंदाज
राज्यातील कोकण भागासह, पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला आहे. मराठवाड्यात देखील पावसाची प्रतीक्षा संपली असून काही भागात जोरदार पाऊस झाला. आज 25 जुलै रोजी हवामानात महत्त्वाचे बदल जाणवत आहे. मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह बीड, लातूर आणि धाराशिव या 4 जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात विजांसह ढगांचा गडगडाट होणार असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/5
पुढील 48 तासांसाठी मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वारे वाहतील. तसेच सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
4/5
गुरुवारी मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला होता. छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता इतर जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला होता. आज छत्रपती संभाजीनगरसह बीड, लातूर आणि धाराशिवमध्ये पावसाची तीव्रता कमी राहील.
advertisement
5/5
श्रावण महिन्याची सुरुवात पावसाने होत असल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. पुढील 48 तास हवामान स्थिती कायम राहणार असून त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: श्रावणाच्या पहिल्याच दिवशी अलर्ट, मराठवाड्यात पावसाचा जोर, 25 जुलैचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल