Marathwada Rain: विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होणार, मराठवाड्यात खरंच पाऊस बरसणार? आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील 24 तासांत काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
advertisement
1/5

राज्यातील कोकण आणि विदर्भ परिसरात पावसाचा जोर कायम आहे. तर मराठवाडा मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठाड्यातील 8 जिल्ह्यांचा आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
आज, 26 जून रोजी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मळणार आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांत दिवसभर आकाश ढगांनी आच्छादलेले राहील. काही ठिकाणी सकाळच्या सुमारास हलका पाऊस तर दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. विशेषतः लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय झाल्यामुळे हवामानात गारवा जाणवेल. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर किमान तापमान 22 ते 24 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढणार असून संध्याकाळनंतर पावसाची शक्यता अधिक आहे.
advertisement
5/5
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आज देखील हलक्या पावसाचा अंदाज असला तरी कोणत्याही जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा नाही. पुढील काही काल हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होणार, मराठवाड्यात खरंच पाऊस बरसणार? आजचा हवामान अंदाज