TRENDING:

Weather Alert: मराठवाड्यात हवापालट! तीन जिल्ह्यांत विजा कडाडणार, इथं गारठा वाढणार

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यात हवापालट! तीन जिल्ह्यांत विजा कडाडणार, इथं गारठा वाढणार
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस हजरी लावत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात 6 नोव्हेंबरला काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाड्यात गुरुवारनंतर हवापालट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाचा होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मराठवाड्यातील उर्वरित छत्रपती संभाजीनगरसह, जालन, बीड, परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये बुधवारपासूनच थंडीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
advertisement
3/5
मराठवाड्यातील काही भागात किमान तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे. आता गुरूवारनंतर मराठवाड्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये 6 नोव्हेंबर रोजी कमाल आणि किमान तापमानात प्रत्येकी एका अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. येथील किमान तापमान 20 अंशावर राहील.
advertisement
4/5
मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील किमान आणि कमाल तापमानात मोठी तफावत जाणवत आहे. सकाळी थंडी, दुपारी कडक उन्ह आणि सायंकाळी ढगाळ हवामानासह हलका पाऊस असे चित्र काठी ठिकाणी आहे. नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान 32 अंशांवर असून किमान 20 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
5/5
दरम्यान, सततच्या पावसामुळे रखडलेल्या रब्बी पेरण्यांना वेग येणार आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सततच्या पावसाने हैराण सर्वसामान्य नागरिकांना देखील दिलासा मिळणार आहे. 6 नोव्हेंबरनंतर मराठवाड्यातील पाऊस पूर्णपणे माघार घेणार असल्याने थंडीसाठी पोषक हवामान तयार होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यात हवापालट! तीन जिल्ह्यांत विजा कडाडणार, इथं गारठा वाढणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल