TRENDING:

वडिलांचं निधनानंतर गावकऱ्यांची साथ, स्नेहाच्या लावणीची सिंगापूरला भुरळ, Video

Last Updated:
गावकऱ्यांनी पैसे गोळा करून स्नेहा दुधाळ हिला सिंगापूरला पाठवलं आणि तिनं आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत मोठं यश मिळवलं.
advertisement
1/7
वडिलांचं निधनानंतर गावकऱ्यांची साथ, स्नेहाच्या लावणीची सिंगापूरला भुरळ, Video
सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत <a href="https://news18marathi.com/maharashtra/dharashiv/">धाराशिवची</a> कन्या स्नेहा दुधाळ हिनं मोठं यश मिळवलंय. 20 ते 25 नोव्हेंबर दरम्यान सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 13 देशांनी सहभाग नोंदवला होता.
advertisement
2/7
भूम तालुक्यातील पाथरूड येथील स्नेहा दुधाळ हिनं स्पर्धेत मराठमोळी लावणी सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला. अनेक संकटांवर मात करत तिनं जागतिक पातळीवर आपल्या नृत्य कौशल्याचा ठसा उमटवल्यानं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. 
advertisement
3/7
स्नेहा दुधाळ हिचे वडील महादेव दुधाळ हे शिक्षक होते. कोरोना काळात त्याचं निधन झालं. घरातील कर्ताधर्ता आधार गेला आणि घरावर दुःखाची छाया पसरली. परंतु खचून न जाता स्नेहाने मोठ्या हिमतीने राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर नृत्याच्या अनेक स्पर्धा प्रथम क्रमांकाने जिंकल्या आहेत. आपल्या नृत्य कौशल्याची जादू तिनं आतरराष्ट्रीय पातळीवरही दाखवली आहे.
advertisement
4/7
स्नेहाच्या घरातील परिस्थिती बेताची असल्याने तिने कुठलाही क्लास केला नाही. मोबाईलवर पाहून ती घरीच डान्स शिकते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिनं मोठं यश संपादन करतेय. स्नेहाला पुढील शिक्षणासाठी डान्स क्लासेससाठी व नृत्य स्पर्धेसाठी आर्थिक मदतीची गरज भासतेय. त्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी पाथरूड येथील ग्रामस्थांकडून करण्यात येतेय.
advertisement
5/7
स्नेहाला सिंगापूर पर्यंतच्या प्रवासासाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्यासाठी पाथरूड येथील गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी स्नेहाला 1.5 लाखांची आर्थिक मदत दिली. याच मदतीमुळे स्नेहाचे एक स्वप्न पूर्ण झाले. मिळालेल्या संधीचं सोनं करत स्नेहानं सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
advertisement
6/7
स्नेहाने आत्तापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. ती घरकामात आईला मदत करते. तसेच शेतीची कामेही ती करते. स्नेहा खूप मोठी कलाकार व्हावी, तिचं स्वप्न तिनं पूर्ण करावं, अशी आईची इच्छा आहे. तर त्यासाठी नातेवाईक आणि गावकऱ्यांचे प्रयत्न आहेत.
advertisement
7/7
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकारने तिला आर्थिक मदत करावी. स्नेहाच्या पाठीमागे आर्थिक बाजू घेऊन सक्षमपणे उभे राहावे, असे आवाहन वागली पाथरुड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/धाराशिव/
वडिलांचं निधनानंतर गावकऱ्यांची साथ, स्नेहाच्या लावणीची सिंगापूरला भुरळ, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल