Manoj Jarange Patil : भाजप आमदार राणा पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Manoj Jarange Patil : धारशिवचे भाजप आमदार राणा पाटील यांनी आज जालना येथे जावून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आरक्षण आंदोलनादरम्यान दोघांच्यात वाद झाला होता. (बालाजी निरपळ, प्रतिनिधी)
advertisement
1/5

भाजप आमदार राणा पाटील यांनी आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जालना येथील अंतरवाली सराटी येथे भेट घेतली.
advertisement
2/5
मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी टीका केल्याने राणा पाटील व मनोज जरांगे यांच्यात वाद झाला होता.
advertisement
3/5
मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना काळा दिवस असल्याचं राणा पाटील यांनी वक्तव्य केलं होतं. राणा पाटील यांच्या अशा वक्तव्याने मराठा समाज त्यांच्या विरोधात आजही आक्रमक आहे.
advertisement
4/5
लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या रोषाचा राणा पाटील व महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना सामना करावा लागत आहे. हा रोष कमी करण्यासाठी राणा पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
5/5
भेटीत राजकीय चर्चा नाही. फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. आमदार राणा पाटील यांची न्यूज 18 लोकमतला माहिती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/धाराशिव/
Manoj Jarange Patil : भाजप आमदार राणा पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण