TRENDING:

Dhule Crime : धुळ्यात चंदनचोर 'पुष्पा'चा धुमाकूळ; शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका, पाहा PHOTO

Last Updated:
Dhule Crime : धुळे जिल्ह्यात चंदन चोरांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले असून पोलीस चोरट्यांनी पकडण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. (दिपक बोरसे, प्रतिनिधी)
advertisement
1/5
धुळ्यात चंदनचोर 'पुष्पा'चा धुमाकूळ; शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका, पाहा PHOTO
धुळे जिल्ह्यात चंदन चोर 'पुष्पा'ने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चंदन चोरांनी थैमान घातलं असताना पोलीस या चोरांना पकडण्यात अपयशी ठरले आहेत.
advertisement
2/5
भोरखेडा शिवारात चंदनाची 25 झाड कापून नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा चंदन तस्करांनी शेतातून चंदनाची चाळीस झाड कापून नेली आहेत. पोलिसांच्या नाकावर टीच्चून या ठिकाणी दर काही दिवसानंतर चंदन चोरी होत आहे. मात्र, गुन्हे दाखल करण्याच्या पलीकडे पोलिसांना पुढे या चोरांच काही करता आलेलं नाही.
advertisement
3/5
याप्रकरणी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार चंदनच्या झाडांची कत्तल करून त्यांची तस्करी केली जात असताना पोलीस फक्त तांत्रिक बाबींची पूर्तता करत असल्याच दिसून येत आहे.
advertisement
4/5
गेल्या काही दिवसांपासून थाळनेर परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून चंदन चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मात्र, प्रत्यक्षात गुन्हा दाखल करत असताना जाणीवपूर्वक कमी रकमेचे गुन्हा दाखल केले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
advertisement
5/5
याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे झालेले आहे. शेत शिवारामध्ये वारंवार चंदन चोरीच्या घटना घडत असताना पोलीस मात्र चौकशी सुरू आहे आणि चोरट्यांना लवकरच पकडण्यात येईल असे नेहमीच आश्वासन देऊन मोकळे होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/धुळे/
Dhule Crime : धुळ्यात चंदनचोर 'पुष्पा'चा धुमाकूळ; शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका, पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल