TRENDING:

शेतकरी टोमॅटो शेतीतून मालामाल; 1 एकर मधून उत्पादन काढण्यास सुरुवात, 5 लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा..! 

Last Updated:
पारंपारिक शेतीला मागे टाकत अनेक शेतकरी भरघोस उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळत आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सटाणा येथील सोमनाथ घावटे यांनी 1 एकर शेतामध्ये जवळपास 8 हजार टोमॅटो झाडांची लागवड केली. त्यांना गतवर्षी या शेतीतून चार ते पाच लाख उत्पन्न मिळाले होते.
advertisement
1/5
शेतकरी टोमॅटो शेती करून मालामाल ; 1 एकर मधून उत्पादन काढण्यास सुरुवात, 5 लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा..!
पारंपारिक शेतीला मागे टाकत अनेक शेतकरी भरघोस उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळत आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सटाणा येथील सोमनाथ घावटे यांनी 1 एकर शेतामध्ये जवळपास 8 हजार टोमॅटो झाडांची लागवड केली. त्यांना गतवर्षी या शेतीतून चार ते पाच लाख उत्पन्न मिळाले होते.
advertisement
2/5
यंदाचे आता उत्पादन काढण्यास सुरुवात झाली असून टोमॅटो शेतीच्या माध्यमातून 5 लाख रुपयांचे उत्पन्न निघेल, अशी अपेक्षा घावटे यांनी लोकल 18 सोबत बोलतांना व्यक्त केली आहे. टोमॅटो लागवडीच्या काळात शेतामध्ये खाली मल्चिंग आणि ठिबक अंथरून, भेसळ डोस करून शेती साफ करून नंतर टोमॅटोची लागवड केली जाते.
advertisement
3/5
ही शेती करण्यासाठी जवळपास 1 लाख रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर 2 महिन्यातच टोमॅटो निघण्यास सुरुवात होते. चांगली मेहनत आणि परिश्रम घेतल्यास तसेच बाजार भाव चांगले राहिल्यास टोमॅटो शेतीतून चांगले उत्पन्न मिळते, भाव कमी असल्यास कमी उत्पन्न मिळते, नफा मिळवण्यासाठी जवळपास तीन ते चार लाख रुपये उत्पन्न निघणे आवश्यक असते तेव्हा सर्व खर्च वजा करून शेतकऱ्याच्या मेहनतीचे फळ मिळते, असे देखील घावटे यांनी सांगितले आहे.
advertisement
4/5
टोमॅटो शेती करताना अनेक वेळा झाडांवर करपा रोगासह विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे कृषी विभागाने सुचविलेल्या औषधांची फवारणी आणि खत देणे महत्त्वाचे असते. टोमॅटोच्या झाडांना दररोज सूर्यप्रकाश झाल्यास तीन तास तर ढगाळ वातावरण असल्यास एक तास पाणी देणे आवश्यक असल्याचे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.
advertisement
5/5
टोमॅटो शेतीतून भरघोस उत्पन्न मिळते, कधी निसर्गाने दगा फटका केल्यास किंवा बाजार भाव न मिळाल्यास किमान लावलेला खर्च तरी निघतो. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील या शेतीकडे वळावे, असे आवाहन घावटे यांनी केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
शेतकरी टोमॅटो शेतीतून मालामाल; 1 एकर मधून उत्पादन काढण्यास सुरुवात, 5 लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा..! 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल