TRENDING:

Lok Sabha Election : महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं! मतदानाआधीच दोघांनी केलं वोटिंग, 100 किमी चालत गेले अधिकारी!

Last Updated:
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक पार पडण्याआधाची गडचिरोलीमध्ये दोघांनी मतदान केलं आहे. राज्यात अशी घटना पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे. गडचिरोली, (महेश तिवारी, प्रतिनिधी) :
advertisement
1/7
महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं! मतदानाआधीच दोघांनी केलं वोटिंग
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. देशातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. याचेच एक उदाहरण गडचिरोली जिल्ह्यातून समोर आली आहे. वयाची 85 पार केलेले मतदान केंद्रापर्यंत जाऊ न शकणारे वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना त्यांच्या घरी गृह मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगाने या निवडणुकीत उपलब्ध करून दिली आहे. त्यातूनच महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचे मतदान असलेल्या गडचिरोली लोकसभा मतदारसंघात आज गृह मतदान झाल आहे.
advertisement
2/7
गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथील 100 वर्षे वय असलेले आणि 86 वर्षे वय असलेल्या दोन मतदारांसाठी शंभर किलोमीटरचा प्रवास करून मतदान पथक त्यांच्या घरी पोहोचलं आणि त्यांनी मतदान केलं. आजारी असल्याने खाटेवर पडून असलेले जास्त वय झालेले वयोवृद्ध नागरिक यांना मतदानाची इच्छा असतानाही ते करू शकत नाही. अशा या दोन मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून लोकशाही व्यवस्थेत आपला सहभाग नोंदवला.
advertisement
3/7
ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंतची प्रत्येक निवडणूक ही लोकशाही व्यवस्थेत खूप महत्त्वाची असते. या निवडणुकीत 18 वर्षापासून ते शंभर वर्षे वयोगटापर्यंतचे नागरिक मतदान करतात. मात्र, वयोवृद्ध झाल्यानंतर किंवा आजारी असले तर मनात इच्छा असूनही अनेकांना मतदान करता येत नाही. मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावणे मोठं कठीण काम या मतदारांसाठी असते.
advertisement
4/7
गडचिरोली चिमूर हा लोकसभा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या सर्वाधिक लांबवर पसरलेला मतदार संघ आहे. या मतदारसंघात जिल्हा प्रशासनाने जिल्हा निवडणूक अधिकारी असलेले गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाच्या या नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. सिरोंच तालुका राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला तालुका आहे. या तालुक्यातून दोन वयोवृद्ध मतदारांसाठी गृह मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
5/7
अहेरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे. दक्षिण गडचिरोलीतील मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी हेच मुख्यालय आहे. या मुख्यालयातून मतदान पथक 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरोंच येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने यांच्या मार्गदर्शनात या मतदान पथकांना आज सकाळी 11 वाजता रवाना करण्यात आले. मतदान 3 वाजता संपणार होतं. दुपारी दोन वाजता मतदान पथक तीन तासाचा प्रवास करून सिरोंचाला पोहोचलं. यात किष्टया मादरबोईना यांचं वय शंभर वर्ष असून गेला एका वर्षापासून ते आजारी असल्याने खाटेवर पडून असतात. 1924 मध्ये जन्मलेले महसूल खात्यात नोकरी करून 1986 मध्ये निवृत्त झालेले किष्ट्या मादरबाईंना संपूर्ण तालुक्यात जमादार किष्टया नावाने प्रसिद्ध आहेत.
advertisement
6/7
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून 2019 च्या निवडणुकीपर्यंत अनेक निवडणुका त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. यावेळी मात्र ते आजारी असल्याने मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकत नव्हते. अशा किष्ट्या मादरबोईंना यांच्या घरी आज दुपारी प्रत्यक्ष मतदान पथक पोहोचलं. प्रकृती बरी नसतानाही खाटेवर बसून त्यांनी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून मतदान करता आलं याबद्दल समाधान व्यक्त केलं. दुसरीकडे सिरोंचा तालुक्यात पुरोहित म्हणून प्रसिद्ध असलेले आणि धर्मराव शाळेत शिक्षक असलेले किष्टया कोम्मेरा यांचं वय 86 असून गेल्या दोन वर्षापासून त्यांची प्रकृती बरी नाही.
advertisement
7/7
लोकशाही व्यवस्थेवर श्रद्धा असलेले मतदानासाठी मतदान केंद्रावर जायला तयार असलेले किष्ट्या कोम्मेरा यांना यावेळी मतदान करायची उत्सुकता होती. मात्र, मतदान केंद्रापर्यंत जायचं कसं असा प्रश्न त्यांना भेडसावत होता निवडणूक आयोगाने घोषित केले आहे नव्या योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गृह मतदान करण्यासाठी आपली इच्छा प्रदर्शित केली होती. त्यामुळे मतदान पथक आज दुपारी त्यांच्या घरी पोहोचलं उत्साहात किष्ट्या कोम्मेरा यावे मतदान केलं. ती मतदान प्रक्रिया आपल्या घरी बसूनच पूर्ण केल्यामुळे किष्टया कोम्मेरा आनंद व्यक्त करत निवडणूक आयोगाचे आभार मानले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/गडचिरोली/
Lok Sabha Election : महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं! मतदानाआधीच दोघांनी केलं वोटिंग, 100 किमी चालत गेले अधिकारी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल