TRENDING:

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उन्हाचा कहर, या जिल्ह्यात 40 मुके जीव झाडावरून कोसळले, एकाने सोडला जीव PHOTOS

Last Updated:
महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे, याचा त्रास मुक्या जनावरांना आणि पक्षांनाही होत आहे. धाराशिवच्या रामलिंग मंदिरात माकडांना उष्माघाताचा त्रास होत असल्याचं समोर आलं आहे. (बालाजी निरफळ, प्रतिनिधी)
advertisement
1/5
महाराष्ट्रात उन्हाचा कहर, या जिल्ह्यात 40 मुके जीव कोसळले, एकाने सोडला जीव
मंदिर परिसरात अडीचशे ते तीनशे माकडांचा वावर आहे, या माकडांना मागच्या दोन दिवसांपासून उष्माघाताचा त्रास होत आहे. यातल्या एका माकडाचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
advertisement
2/5
मंदिराच्या आसपास मोठं जंगल आहे तरी पाण्याची कमतरता भासू लागली आहे, त्यामुळे माकडाचा मृत्यू झाल्याचा अंदाज पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
3/5
उष्माघाताची बाधा 40 माकडांना पोहोचली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या माकडाचं तसंच परिसरातल्या पाण्याचं सॅम्पल तपासणीसाठी पुण्याच्या पशूवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं आहे.
advertisement
4/5
धाराशिवच्या येडशीमधील रामलिंग मंदिर माकडांचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. याच मंदिरात वाढलेल्या उन्हाळ्यामुळे माकडं हैराण झाली आहेत.
advertisement
5/5
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उन्हाचा कहर, या जिल्ह्यात 40 मुके जीव झाडावरून कोसळले, एकाने सोडला जीव PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल