12 वर्षांची चिमुरडी सातासमुद्रापार उंचावणार जालनाची मान
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
जालना जिल्ह्यातील 12 वर्षीय तेजश्री चौधरी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाची वारी करणार आहे.
advertisement
1/7

भारताची अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान 3 चे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर या क्षेत्रात मुलांचा रस वाढत आहे. ग्रामीण भागातील मुलं देखील या क्षेत्रात करियर करण्यासाठी पुढं येत आहेत. याचंच उदाहरण म्हणजे <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना जिल्ह्यातील</a> लिखित पिंपरीची तेजश्री चौधरी होय.
advertisement
2/7
शिक्षक कन्या असणाऱ्या तेजश्रीची अवघ्या 12 वर्षी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालीय. तिच्या या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
advertisement
3/7
नासाच्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर येथे प्रशिक्षण कार्यक्रम निवडीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाउंडेशन आणि सेडोर इंटरनॅशनलद्वारे 26 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. यात गणित, विज्ञान, भूगोल आणि बुद्धिमापन यावर आधारित प्रश्न होते.
advertisement
4/7
परीक्षेत राज्यातील 11, तर मराठवाड्यातील तीन विद्यार्थी पात्र झाले आहेत. ही परिक्षा देशातील विविध शाळांमध्ये घेण्यात आली होती. तेजश्रीने ही परिक्षा उत्तीर्ण केल्यामुळे तिला अंतराळ संशोधनाचा अभ्यास करण्याची संधी मिळणार असल्याचे तेजश्रीचे वडील महेश कुमार चौधरी यांनी सांगितले.
advertisement
5/7
तेजश्रीचे वडील महेश चौधरी हे मुळचे परतूर तालुक्यातील लिखित पिंपरीचे रहिवासी आहेत. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात ते जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर आई गृहिणी आहे.
advertisement
6/7
परतूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावातून एवढ्या कमी वयात तेजश्रीने मोठी भरारी घेतलीय. तिची नासा अभ्यास दौऱ्यासाठी झालेली निवड गौरवास्पद असल्याने सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होतोय.
advertisement
7/7
तेजश्रीचे तिसरी ते पाचवी शिक्षण उस्मानपूर येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. यापूर्वी पाचवीत नवोदय परीक्षेतही तिने यश संपादन केलेले आहे. सध्या ती सेलू (जि. परभणी) येथील प्रिन्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षण घेत आहे. भविष्यात शास्त्रज्ञ होऊन देशाचे नाव मोठे करायचे आहे, असे तेजश्रीने सांगिते.