Jalna Accident : पंढरपूरवरुन येताना टॅक्सी थेट विहिरीत कोसळली; 7 भाविक ठार; काळजाचा थरकाप उडवणारे PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Jalna Accident : जालना जिल्ह्यात प्रवासी वाहतूक करणारी एक काळीपिवळी टॅक्सी थेट विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे. (रवी जैस्वाल, प्रतिनिधी)
advertisement
1/5

प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातल्या राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली.
advertisement
2/5
दुचाकीला वाचवताना टॅक्सी थेट विहिरीत कोसळली. यात 12 प्रवासी होते जे की पंढरपूर याठिकाणाहून परतत होते.
advertisement
3/5
जालन्याहून एका टॅक्सीने ते गावाकडे निघाले होते. मृतांमधील चनेगाव आणि तुपेवाडी याठिकाणचे हे रहिवासी होते. या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू आहे.
advertisement
4/5
दरम्यान या घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारना केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
advertisement
5/5
ताराबाई मालुसरे, रा.तपोवन, नंदा तायडे, प्रल्हाद बिटले, नारायण किसन निहाळ, चंद्रभागा घुगे आणि प्रल्हाद महाजन (सर्व राहणार चनेगाव) असे मृत भाविकांची नावे आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जालना/
Jalna Accident : पंढरपूरवरुन येताना टॅक्सी थेट विहिरीत कोसळली; 7 भाविक ठार; काळजाचा थरकाप उडवणारे PHOTOS