तब्बल 7 लाखांचा पेन, विशेषता पाहून तुम्हीही व्हाल अवाक, PHOTOS
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
कोल्हापुरात दोन दिवसीय पेन शोचे आयोजन करण्यात आले होते. पेनाच्या दुर्मिळ आणि विविध शेड्सच्या शाईपासून ते जगभरातल्या 50 हून अधिक ब्रँड्सचे पेन कोल्हापूरकरांना पाहता आणि खरेदी करता आले.
advertisement
1/7

लिखाण करण्यासाठी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेन आणि लिखाणाची आवड असणाऱ्यांना विविध प्रकारचे पेन पाहणे आणि वापरण्याची आवड नेहमीच असते.
advertisement
2/7
अशातच <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापुरात</a> दोन दिवसीय पेन शोचे आयोजन करण्यात आले होते. पेनाच्या दुर्मिळ आणि विविध शेड्सच्या शाईपासून ते जगभरातल्या 50 हून अधिक ब्रँड्सचे पेन कोल्हापूरकरांना पाहता आणि खरेदी करता आले.
advertisement
3/7
या पेन शोमध्ये जगभरातील 50 हून अधिक नामांकित ब्रँडचे तब्बल 2000 पेक्षा जास्त फॉऊंटन पेन, रोलर पेन, बॉल पेन, मेकनाईज्ड पेन्सिल्स कोल्हापूरकरांना पाहायला मिळाल्या.
advertisement
4/7
अगदी 200 रुपयांपासून ते 7 लाख रुपयापर्यंतचे विविध पेन या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. यातील इटलीमध्ये तयार झालेला 7 लाख रुपये किमतीचा पेन देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. याचे चार प्रकारचे विविध डिझाईनचे पेन या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.
advertisement
5/7
या पेनासह आणि त्यावरील कलाकुसर हाताने तयार करण्यात आलेली आहे. तर पेन पूर्णपणे चांदीचा असून त्याची नीब ही सोन्याची आहे.
advertisement
6/7
त्याचबरोबर या पेनावर वेगवेगळ्या आठ प्रकारचे खडे हे जडवण्यात आले आहेत. त्यामुळे या पेनाची किंमत इतकी जास्त आहे.
advertisement
7/7
दरम्यान पद्धतीचे जगात फक्त 333 पेन तयार करण्यात आले असून भारतात 12 पेन विक्रीसाठी आले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
तब्बल 7 लाखांचा पेन, विशेषता पाहून तुम्हीही व्हाल अवाक, PHOTOS