कोल्हापुरात 2 कोंबड्यांचं 'भांडण', सोडवायला गेले पोलीस, दोघांनाही घेतलं ताब्यात
- Published by:Priya Lad
Last Updated:
आतापर्यंत पोलिसांना माणसांमधील वाद मिटवताना पाहिलं असेल पण पोलिसांनी कोंबड्यांमधील झुंजही थांबवली आहे.
advertisement
1/5

कोल्हापुरातील यामागे गावात कोंबड्यांची झुंज आयोजित करण्यात आली होती. सांगलीतील प्राणीमित्र संघटनेचे ॲड बसवराज होसगौडर यांना कोंबड्यांच्या या झुंजीबाबत गुप्त माहिती मिळाली.
advertisement
2/5
होसगौडर यांनी याबाबत मुरगूड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजी खारे यांना कॉल करून माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितलं. पोलीस निरीक्षक शिवाजी खारेंनी त्यांच्या टीमसह घटनास्थळी छापा टाकला.
advertisement
3/5
पोलिसांनी या झुंजीतील कोंबड्या, मोटार सायकल जप्त केल्या आहेत. तसंच झुंजीचं आयोजन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.
advertisement
4/5
महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी प्राण्यांची झुंज लावून, जिंकलेल्या प्राणीमालकास पैसे तसंच ट्रॉफी दिली जाते. यात मोठया प्रमाणावर बेकायदेशीर पैशाची उलाढाल होते. असं बेकायदेशीर कोणत्याही प्राण्यांची झुंज लावणं गंभीर गुन्हा असून कारवाई करावी म्हणून महाराष्ट्र प्राणी मित्र संघटना मागणी करत आहे.
advertisement
5/5
प्राणीमित्र ॲड बसवराज होसगौडर म्हणाले, अशा प्रकारे कोणत्याही प्राण्यांची झुंज लावणं प्राणी क्रूरता कायदा 1960 अंतर्गत गंभीर दखल पात्र गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर 3 महिने शिक्षा आणि दंड आहे"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापुरात 2 कोंबड्यांचं 'भांडण', सोडवायला गेले पोलीस, दोघांनाही घेतलं ताब्यात