Weather Alert : महाराष्टात आता बर्फासारखी थंडी येणार, पुन्हा पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये 22, 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/7

दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये 22, 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यांमध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. पाहुयात 22 नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे, तर मुंबईतील कमाल तापमान 33 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढं राहील. कोकणातील सिंधुदुर्गमध्ये तसेच रत्नागिरीमध्ये हलक्या पावसाची देखील शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्येही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे आणि सोलापूरमध्ये कोरडे हवामान राहणार आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील कडाक्याच्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नाशिकमधील कमाल तापमान 30 तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढं राहील. तर जळगावमधील किमान तापमान 13 आणि कमाल तापमान 30 श सेल्सिअस एवढं असेल.
advertisement
5/7
मराठवाड्यातील नागरिकांना वाढत्या गारव्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 22 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानात 1 अंशाने वाढ होऊन ते 15 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. तर नांदेडमध्ये 14 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहील.
advertisement
6/7
नागपूरमध्ये सकाळी निरभ्र आकाश राहणार असून दुपारनंतर ते ढगाळ होण्यास सुरुवात होईल, तर कमाल तापमान 29 तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढं राहील. अमरावती शहरामध्ये देखील ढगाळ आकाशासह किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
एकंदरीत पुढील दोन दिवस राज्यातील नागरिकांना वाढत्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांमध्ये अंशतः ढगाळ आकाश राहण्याची देखील शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Weather Alert : महाराष्टात आता बर्फासारखी थंडी येणार, पुन्हा पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट