तो पुन्हा येतोय! पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील 48 महत्त्वाचे, IMD चा अलर्ट
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रात येत्या 48 तासांत पाऊस पुन्हा हजेरी लावणार आहे. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेला पुन्हा सक्रीय होतोय. पुढचे दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्यासह विविध ठिकाणी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढचे दोन दिवस पुण्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुण्यातील पुरंदर, खेड, राजगुरू नगर याठिकाणी देखील पावसाचा जोर असणार आहे. पुण्यात 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असून पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. सातारा जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाबळेश्वर मध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साताऱ्यात 28 अंश कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर मध्ये 29 अंश कमाल तर 21 अंश किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सांगली जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगली शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. सकाळपासूनच काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. सांगली, मिरज शहरासह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. सांगलीत 28 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
तो पुन्हा येतोय! पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील 48 महत्त्वाचे, IMD चा अलर्ट