पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं तुफान, आज पुन्हा कोसळणार, अपडेट पाहिलं का?
- Reported by:Shivani Dhumal
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Forecast: गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज पुन्हा एकदा काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
advertisement
1/7

संपूर्ण राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर आहे. आज पुन्हा काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/7
पुणे शहरासह परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहील. पुणे जिल्ह्यातील हवेली, पुणे शहर, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव या ठिकाणी मध्यम ते अतिमध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात आज 28 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/7
सातारा शहरात जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोरेगाव, खटाव, कराड, पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण आणि माण या तालुक्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साताऱ्यात 26 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/7
कोल्हापूरमधील करवीर, इचलकरंजी, गडहिंगलज, राधानगरी या भागात पावसाने उघडीप दिली असून आज कोल्हापूरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज कोल्हापूर मध्ये 28 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/7
सांगली शहरात मध्यम ते अतिमध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी आकाश निरभ्र राहिलं. सांगलीत 26 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माढा, सांगोला आदी तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर मध्ये 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
7/7
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच ऊन आणि पावसाचामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं तुफान, आज पुन्हा कोसळणार, अपडेट पाहिलं का?