लातूर महापालिकेची पार्किंग खड्डयात, जमिनीतच रूतली चारचाकी, पाहा PHOTO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
लातूर शहरातील गांधी मार्केट परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये लावलेली चारचाकी गाडी स्लॅब फुटून खड्ड्यात पडल्याची घटना घडली आहे.त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
advertisement
1/6

लातूर जिह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पाहून नागरीक चांगलेच भयभीत झाले आहे.
advertisement
2/6
लातूर शहरातील गांधी मार्केट परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये लावलेली चारचाकी गाडी स्लॅब फुटून खड्ड्यात पडल्याची घटना घडली आहे.त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
advertisement
3/6
सुदैवाने त्यावेळी गाडीत कुणीही नसल्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही पण वाहन चालकाची वित्तहानी झाली आहे.
advertisement
4/6
निकृष्ट दर्जाचा स्लॅब असल्यामुळेच पार्किंग एरिया मधील गाडी खड्ड्यात पडल्याचे बोलले जात आहे.
advertisement
5/6
जवळपास 25 वर्षांपूर्वी महापालिकेच्या पार्किंग एरियाचे बांधकाम करण्यात आलं होतं. मात्र आता हा निकृष्ठ दर्जाचा स्लॅब कोसळून चार चाकी खड्ड्यात गेल्याने २५ वर्षापूर्वी केलेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे.
advertisement
6/6
या घटनेनंतर क्रेनच्या सहाय्याने खड्ड्यात गेलेली गाडी काही वेळानंतर काढण्यात यश आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
लातूर महापालिकेची पार्किंग खड्डयात, जमिनीतच रूतली चारचाकी, पाहा PHOTO