Latur Loksabha : महाराष्ट्रातलं असं मतदान केंद्र, जिथे एकही मतदार फिरकला नाही, काय आहे कारण?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Latur Loksabha : लातूर जिल्ह्यातील सुनेगाव सांगवी गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. सकाळी सात वाजल्यापासून एकही मतदान झाले नाही. (नितिन बनसोडे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

आज राज्यात लोकसभेच्या 11 जागांसाठी मतदान होत आहे. यात लातूर लोकसभेचाही समावेश आहे. मात्र, लातूर जिल्ह्यातील एका गावात सकाळपासून दुपारपर्यंत एकही मतदान झालं नाही.
advertisement
2/5
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव सांगवी येथील गावकऱ्यांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकला आहे.
advertisement
3/5
मतदान केंद्र क्र-44 सुनेगावं सांगवी येथील पुरुष-256 व स्त्री-221 अशा एकूण 477 मतदारांनी लातूर नांदेड हायवेवर कट पॉईंट मिळण्यासाठी लोकसभा निवडणूक मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकला आहे.
advertisement
4/5
लातूर नांदेड हायवेवर असलेल्या गावामुळे गावकऱ्यांना पाच किलोमीटरचा वळण रस्ता घेत प्रवास करावा लागतोय. यामुळे सकाळी सात वाजल्यापासून अद्याप एकही मतदान या केंद्रावर झाले नाही.
advertisement
5/5
जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मतदान करणार नसल्याचा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/लातूर/
Latur Loksabha : महाराष्ट्रातलं असं मतदान केंद्र, जिथे एकही मतदार फिरकला नाही, काय आहे कारण?