TRENDING:

Weather Update : राज्यात यंदा गुलाबी थंडी नाहीच? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

Last Updated:
डिसेंबर महिना उजाडला असला तरी राज्याच्या बहुतेक भागांमध्ये अजूनही थंडी जाणवत नसल्याचं चित्र आहे. यंदा पावसाळ्यात पाऊसही कमी झाला. अशात आता हिवाळ्यातही थंडी जाणवत नसल्याचं चित्र आहे.
advertisement
1/7
राज्यात यंदा गुलाबी थंडी नाहीच? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
उत्तरेकडून जोरात येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात थंडी जाणवत आहे. मात्र, राज्यातील इतर भागांमध्ये अजूनही नागरिकांना थंडी जाणवत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे थंडी कधी वाढणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे
advertisement
2/7
गेल्या आठवड्यात राज्यात अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. यावेळी राज्यभरात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. राज्याच्या काही भागांमध्ये तर गारपीटही झाली. या पावसानंतर वातावरणात थंडी जाणवू लागेल, असा अंदाज होता
advertisement
3/7
आता मात्र पाऊसही थांबला असून थंडीही गायब झाली आहे. यंदा हिवाळ्यातही बऱ्यापैकी उकाडा जाणवत असल्याचं चित्र आहे. डिसेंबर उजाडला असला तरीही राज्यात थंडीच गायब आहे
advertisement
4/7
यंदा थंडी कमीच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा राज्याच्या अनेक भागात किमान तापमान अधिक राहणार असल्याने थंडीची लाट येणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच यंदा थंडी कमी राहील
advertisement
5/7
तसंच पाऊस कमी पडल्यामुळे डिसेंबरच्या शेवटीही किमान तापमान अधिकच राहील. त्यामुळे फार थंडी जाणवणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या आठवड्यात २-३ दिवस किमान तापमानात घट झाली होती
advertisement
6/7
यामुळे थंडी जाणवत होती. मात्र, आता पुन्हा थंडी गायब झाली आहे. मध्य आणि उत्तर भारत वगळता देशाच्या इतर भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिकच राहणार आहे.
advertisement
7/7
त्यामुळे या भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल्याने थंडी जाणवणार नाही, असं हवामान विभागाने सांगितलं. यामुळे यंदा राज्यातील नागरिकांनाही गुलाबी थंडीचा फारसा आनंद घेता येणार नाही
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update : राज्यात यंदा गुलाबी थंडी नाहीच? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल