TRENDING:

Photo: कुणाची बायको, कुणाचा भाऊ, कुणाची सून, सत्ताधाऱ्यांची घराणेशाही.... लढायला कार्यकर्ते, पदावर घरातले!

Last Updated:
घराणेशाहीचा विषय राजकारणात नेहमीच चर्चेत असतो. त्याचं कारणही तसंच आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावरच नेत्यांचं राजकारण सुरू असतं. सोशल मीडियावर विरोधकांच्या विरोधात पोस्ट करणं असो की रस्त्यावर उतरून प्रचार करणं असो किंवा अंगावर केसेस घेणं असो यासाठी कार्यकर्ते पुढे असतात. याच साठी नेत्यांना कार्यकर्ते हवे असतात. मात्र हेच कार्यकर्ते नगराध्यक्ष व्हावे, आमदार व्हावे असं नेत्यांना वाटत नाही. परिणामी कार्यकर्ते सतरंजीच उचलत राहतात आणि नेत्यांचे कुटुंबीय खुर्चीवर, मोठ्या पदावर बसतात.
advertisement
1/12
Photo: कुणाची बायको, कुणाचा भाऊ, कुणाची सून, सत्ताधाऱ्यांची घराणेशाही!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेत्यांनी नगराध्यक्षपदाची तिकीटं घरातच ठेवून घेतली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची म्हणवली जाणारी ही निवडणूक नेत्यांची मक्तेदारी झालीय. परिणामी कार्यकर्त्यांनी सतरंजीच उचलायची का? असा प्रश्न आता विचारला जातोय. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देण्याची वेळ आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा घराणेशाहीवर कठोर प्रहार केलेत. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरूणांनी राजकारणात यावं, त्यांनी कर्तृत्वावर यश मिळवावं असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलंय. मात्र सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतही तिकीट मिळताना दिसत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेतात. मात्र आता खासदार, मंत्री आणि आमदारांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारीही त्यांच्याच घरात ठेवलीय.
advertisement
2/12
जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी त्यांच्या पत्नी साधना महाजन यांना जामनेरमधून उमेदवारी दिलीय.
advertisement
3/12
खामगाव नगरपरिषदेत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी त्यांच्या वहिनी अपर्णा फुंडकरांना तिकीट दिलंय.
advertisement
4/12
पुसदच्या नगराध्यक्षपदासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनी त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना मैदानात उतरवलंय.
advertisement
5/12
राज्यमंत्री संजय सावकारेंनी भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी त्यांच्या पत्नी रजनी सावकारेंना दिलाय.
advertisement
6/12
शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचं तिकीट त्यांची पत्नी सुनीता पाटील यांना दिलं.
advertisement
7/12
बुलढाणा नगरपरिषदेची उमेदवारी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची पत्नी पूजा गायकवाड यांना दिलं.
advertisement
8/12
मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांची मुलगी संजना पाटीलला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली.
advertisement
9/12
अनगर नगरपंचायतीसाठी भाजप नेते राजन पाटील यांनी त्यांची सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी दिली.
advertisement
10/12
चाळीसगाव नगरपरिषदेसाठी भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी त्यांची पत्नी प्रतिभा चव्हाण यांना मैदानात उतरवलं.
advertisement
11/12
आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर नगराध्यक्षपदासाठी आपल्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
advertisement
12/12
माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आपले बंधू समशेरसिंह यांना फलटण नगराध्यक्षपदासाठीनिवडणुकीच्या रणांगतणात उतरवले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Photo: कुणाची बायको, कुणाचा भाऊ, कुणाची सून, सत्ताधाऱ्यांची घराणेशाही.... लढायला कार्यकर्ते, पदावर घरातले!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल