नागपूर - उमरेड रोडवर धावत्या ट्रॅव्हल्सला आग,काही मिनिटात बस जळून खाक; काळजाचा ठोका चुकवणारे फोटो
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Nagpur Umred Road Bus Fire: धावत्या बसला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे,
advertisement
1/7

पुण्यातील नवले ब्रीजवर झालेल्या अपघाताची घटना ताजी असताना नागपूर-उमरेड रोडवर धावत्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे.
advertisement
2/7
नागपूर उमरेड मार्गावर VIT कॉलेज ते उकळवाही हेटी दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
3/7
यावेळी बसमध्ये एकूण ४५ प्रवाशी प्रवास करत होते. सुदैवाने सर्वजण वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.
advertisement
4/7
धावत्या बसला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे,
advertisement
5/7
चालकाने तातडीने बस थांबवत आणि प्रवाशांना बाहेर काढले, अन् काही क्षणांतच बसने पेट घेतला.
advertisement
6/7
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी मदत करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र बसचा मोठा भाग जळून खाक झाला. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.
advertisement
7/7
प्रवाशांमध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले. घटनेची अधिक तपास कुही पोलिस तपास करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
नागपूर - उमरेड रोडवर धावत्या ट्रॅव्हल्सला आग,काही मिनिटात बस जळून खाक; काळजाचा ठोका चुकवणारे फोटो