विदर्भात पावसाचा जोर कायम, 4 जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह धो धो कोसळणार!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
विदर्भात गेले काही दिवस तुरळक ठिकाणी चांगला पाऊस झालाय. आजही चार जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/5

राज्यात गेल्या महिन्यापासून ते आतापर्यंत वातावरणात अनेक बदल बघायला मिळाले. आताही स्थिती काहीशी तशीच आहे. काही ठिकाणी ऑक्टोबर हिट तर काही ठिकाणी पाऊस असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विदर्भात गेले काही दिवस तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे उन्हाचा पारा गेले दोन दिवस थोडा कमी झालाय.
advertisement
2/5
सोमवारी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. आज 22 ऑक्टोबरला विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
3/5
विदर्भातील भंडारा, नागपूर, यवतमाळ, वर्धा या चार जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित अमरावती, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
4/5
सोमवारी अमरावतीमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झालाय. विदर्भातील काही जिल्ह्यांत शेतीचे सतत नुकसान होत आहे.
advertisement
5/5
शेतकरी थोडा सावरायला लागला की, त्यामागे काही न काही नवीन संकट येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भात पावसाचा जोर कायम, 4 जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह धो धो कोसळणार!