TRENDING:

'ऑक्टोबर हिट'ने फोडला घाम, पाहा विदर्भातील आजचं तापमान

Last Updated:
Weather Updates, October Hit, Nagpur News News18marathi 
advertisement
1/7
'ऑक्टोबर हिट'ने फोडला घाम, पाहा विदर्भातील आजचं तापमान
मान्सूनने देशभरातून काढता पाय घेतला असताना राज्याच्या सर्वच जिल्हातील तापमानात मात्र वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे ऑक्टोबर हिटच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. तर येत्या काळातही तापमानवाढ आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे,
advertisement
2/7
उन्हासोबत वातावरणात आर्द्रतेच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या झळा उन्हाळ्या इतक्याच असह्य असल्याने नागरिकांना मनस्थाप सहन करावा लागतो आहे.
advertisement
3/7
हवामानात झालेल्या या बदलामुळे सध्या हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.किमान व कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे. येत्या काही आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
advertisement
4/7
ऑक्टोबरमधील वाढत्या उष्णतेमुळे नागपूरकरांचा चांगलाच घाम फोडला आहे. त्यात अकोला जिल्हा आधीच उष्णता असताना आता त्यात ऑक्टोबर हिटची भर पडलीय. त्यामुळं वातावरणात चांगलाच उकाडा निर्माण झाला आहे. विदर्भात सर्वाधिक अकोला तापमान 37.2 अंश सेल्सिअस हे सर्वाधिक तापमान गणला गेले आहे.
advertisement
5/7
तरी विदर्भातील गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून वातावरणात उष्मा असल्याने आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. विदर्भात आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
advertisement
6/7
नागपूरचं नाही तर हा परिणाम संपूर्ण विदर्भात दिसून येत आहे. विदर्भाला देखील या उष्म्याने घाम फोडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान 35 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ अकोला 37.2 अंश सेल्सिअस वर आहे. तापमान अचानक वाढले तर वातावरणात उष्मा वाढल्याने चांगलाच उकाडा निर्माण झाला आहे.
advertisement
7/7
नागपूर शहरात आज कमाल 36.1 तर किमान तापमान 20.6, गोंदिया कमाल 34.9 तर किमान 22.3, गडचिरोली कमाल 34.8 तर किमान 22.0, चंद्रपूर कमाल 35.0 तर किमान 22.4, यवतमाळ कमाल 35.7 तर किमान 19, वाशिम कमाल 36.0 तर किमान 19.8, बुलढाणा कमाल 33.2 तर किमान 21.2, अमरावती कमाल 35.0 तर किमान 21.1 अंश सेल्सिअस आहे. वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान 35.5 तर किमान तापमान 22.4 अंश सेल्सिअस आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
'ऑक्टोबर हिट'ने फोडला घाम, पाहा विदर्भातील आजचं तापमान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल