TRENDING:

Vidarbha Weather Update: विदर्भात गारठा कायम, भंडाऱ्यात पारा घसरला, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Vidarbha Weather Update: विदर्भातील किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झाली असली तरीही विदर्भात पहाटे आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना कडाक्याची थंडी जाणवत आहे. गेले दोन दिवस काही जिल्ह्यातील किमान तापमान स्थिर असल्याचे दिसून येत आहे.
advertisement
1/5
विदर्भात गारठा कायम, भंडाऱ्यात पारा घसरला, हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून गारठा वाढलाय. पुणे आणि नाशिकसह विदर्भातही थंडीचा कडाका कायम असल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झाली असली तरीही विदर्भात पहाटे आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना कडाक्याची थंडी जाणवत आहे. गेले दोन दिवस काही जिल्ह्यातील किमान तापमान स्थिर असल्याचे दिसून येत आहे. विदर्भात सर्वात कमी किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके आहे.
advertisement
2/5
पुढील काही दिवसांत विदर्भातील किमान तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज 19 डिसेंबर रोज गुरुवारला विदर्भात सर्वत्र निरभ्र आकाश असणार आहे. गुरुवारला कुठलीही पावसाची शक्यता नाही. मात्र, शुक्रवारी गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातून ढगाळ वातावरण सुद्धा आता गायब झाले आहे. विदर्भात सर्वात कमी किमान तापमान हे भंडारा जिल्ह्यात नोंदवल्या गेले आहे.
advertisement
3/5
भंडारा येथील किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. नागपूर, गोंदिया, वाशिम या तीन जिल्ह्यातील किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. या जिल्ह्यातील किमान गेले 2 दिवस तापमान स्थिर असल्याचे दिसून येत आहे. अमरावती, अकोला, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यातील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
advertisement
4/5
विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. तरीही विदर्भात गारठा कायम आहे. बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील किमान तापमान हे 11 ते 14 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.
advertisement
5/5
पुढील काही दिवसांत या तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. गेले कित्येक दिवस विदर्भात ढगाळ आकाश कायम होते. आता मात्र दोन दिवसांपासून विदर्भात निरभ्र आकाश बघायला मिळत आहे. त्यामुळे तूर पिकांवरील संकट टाळण्यासाठी मदत होणार आहे. ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Weather Update: विदर्भात गारठा कायम, भंडाऱ्यात पारा घसरला, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल