vidarbha weather update : विदर्भात थंडीचा जोर कमी, तापमानाचा पारा पुन्हा वाढला, पाहा आजचं हवामान अपडेट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
vidarbha weather update : आज 7 जानेवारीला विदर्भातील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. विदर्भातील तुरळक जिल्ह्यातील किमान तापमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
1/5

राज्यात गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढलेला दिसून येत होता. विदर्भातही गेल्या आठवड्यात कडाक्याची थंडी बघायला मिळाली. मात्र, आज 7 जानेवारीला विदर्भातील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. विदर्भातील तुरळक जिल्ह्यातील किमान तापमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. 7 जानेवारीला विदर्भात अंशतः ढगाळ आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे.
advertisement
2/5
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. गोंदियातील किमान तापमान देखील 13 अंश सेल्सिअस इतकेच असणार आहे. गोंदियातील पारा आणखी दोन दिवसांनी घसरण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
3/5
अमरावती, वर्धा या दोन जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. तर अकोला, यवतमाळ, वाशिम या तीन जिल्ह्यातील किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. या जिल्ह्यातही अंशतः ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस येथील किमान तापमान स्थिर राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
4/5
चंद्रपूर जिल्ह्यातील किमान तापमान 16 अंश सेल्सिअस तर बुलढाणा जिल्ह्यातील किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यातील किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. विदर्भातील तुरळक जिल्ह्यांत पुढील काही दिवस किमान तापमान स्थिर राहणार आहे.
advertisement
5/5
विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या किमान तापमानात वाढ झालीये. मात्र गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यातील किमान तापमान स्थिर असल्याचे दिसून येत आहे. 7 जानेवारीला गडचिरोली येथील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर भंडारा जिल्ह्यातील किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भातील वातावरणात सातत्याने बदल घडून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
vidarbha weather update : विदर्भात थंडीचा जोर कमी, तापमानाचा पारा पुन्हा वाढला, पाहा आजचं हवामान अपडेट