vidarbha weather update : विदर्भात थंडीची लाट, 3 जिल्ह्यांत पारा 10 अंश सेल्सिअस, IMD नं दिला अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
vidarbha weather update : विदर्भात 9 जानेवारीला कोरडे हवामान असणार आहे. तुरळक जिल्ह्यांत निरभ्र आकाश तर काही ठिकाणी धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. काही जिल्ह्यांतील किमान तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर वाढणार आहे.
advertisement
1/5

गेल्या आठवड्यापासून राज्यात थंडीचा जोर कायम आहे. विदर्भात गेल्या दोन दिवसांत काही भागातील थंडीचा जोर कमी झाला होता. आता पुन्हा त्यात वाढ झालेली दिसून येत आहे. गोंदिया, भंडारा आणि यवतमाळ मधील पारा घसरल्याने विदर्भात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
2/5
विदर्भात 9 जानेवारीला कोरडे हवामान असणार आहे. तुरळक जिल्ह्यात निरभ्र आकाश तर काही ठिकाणी धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. काही जिल्ह्यांतील किमान तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर वाढणार आहे. गोंदिया, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांतील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असून काही ठिकाणी निरभ्र आकाश तर काही ठिकाणी धुके आणि ढगाळ आकाश असणार आहे.
advertisement
3/5
विदर्भातील सर्वात कमी तापमानाची नोंद या तीन जिल्ह्यांत झाली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. नागपूर, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्यातील किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी निरभ्र आकाश तर काही ठिकाणी धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. या ठिकाणी सुद्धा गारवा जाणवणार आहे.
advertisement
4/5
अकोला, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. तर चंद्रपूरमधील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सुद्धा धुके आणि ढगाळ आकाश असणार आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढलाय.
advertisement
5/5
विदर्भात थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांनी आपले आरोग्य जपण्याची सर्वाधिक गरज आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमानात घट झाली आहे. मात्र, वाशिममधील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. 9 जानेवारीला वाशिममधील किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
vidarbha weather update : विदर्भात थंडीची लाट, 3 जिल्ह्यांत पारा 10 अंश सेल्सिअस, IMD नं दिला अलर्ट