Vidarbha Weather : काळजी घ्या! विदर्भात अवकाळी पावसाचा जोर कायम, हवामान विभागाचा यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 11 मे रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
1/7

मे महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हापासून अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडत आहे.
advertisement
2/7
काही भागांत गारपीटही झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
3/7
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 11 मे रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
4/7
आज विदर्भातील बहुतांश भागांत तापमान 37 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. उष्णतेची तीव्रता असूनही ढगाळ वातावरणामुळे काहीशी उकाड्याची भावना जाणवत आहे. नागपूर, अकोला, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांत कमाल तापमान 40 अंशांच्या वर असून, दमट हवामानामुळे अस्वस्थता अधिक जाणवत आहे.
advertisement
5/7
सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून दुपारनंतर वादळी वाऱ्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये जोरदार वारे वाहत असून झाडे व विजेच्या तारा कोसळण्याचा धोका देखील आहे.
advertisement
6/7
गोंदिया, बुलढाणा, वाशिम आणि गडचिरोली परिसरातही हवामानात सतत चढ-उतार होत आहेत. नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या सर्व जिल्ह्यांत हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
7/7
अचानक पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतातील काढणीस तयार पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत त्याचबरोबर इतरही काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी सुद्धा आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Weather : काळजी घ्या! विदर्भात अवकाळी पावसाचा जोर कायम, हवामान विभागाचा यलो अलर्ट