Nagpur Weather: वादळी पाऊस झोडपणार, 24 तास महत्त्वाचे, नागपूरसह 11 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Vidarbha Weather: राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून विदर्भात आज अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

विदर्भात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. विशेषतः फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हवामान विभागाने आज 15 मे रोजी पुन्हा एकदा विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
विदर्भात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, दुपारी आणि सायंकाळच्या दरम्यान अनेक ठिकाणी विजांसह पावसाचा जोर वाढू शकतो. काही भागांत वादळी वाऱ्यांसह हवामान अस्थिर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्यप्रकाश मर्यादित राहणार असून, दिवसाचे तापमान काही अंशी कमी जाणवेल.
advertisement
3/5
विदर्भातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमान 23 ते 29 अंश सेल्सिअसदरम्यान तर कमाल तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया परिसरात उष्णतेसह दमटपणा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याची तीव्रता जाणवू शकते. दुसरीकडे, बुलढाणा आणि अमरावतीसारख्या भागांमध्ये सायंकाळी वातावरण काहीसे उष्णतेपासून दिलासा देणारे राहू शकते.
advertisement
4/5
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्वच जिल्ह्यांत सामान्यतः ढगाळ वातावरण राहून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/5
प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांच्या गडगडाटाच्या वेळी घरातच थांबावे. झाडांच्या किंवा विजेच्या खांबांच्या खाली थांबू नये. आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी देखील आपली पिके आणि फळबागा संरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Weather: वादळी पाऊस झोडपणार, 24 तास महत्त्वाचे, नागपूरसह 11 जिल्ह्यांना अलर्ट