TRENDING:

पुढील 2 दिवस विदर्भासाठी महत्वाचे, पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Last Updated:
पुढील 2 दिवसांत विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. 
advertisement
1/4
2 दिवस विदर्भासाठी महत्वाचे, पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
राज्यात काही दिवसांपासून वातावरणामध्ये खूप बदल होतांना दिसून येत आहे. कुठे उष्णतेचा पारा तर कुठे पावसाचा जोर कायम आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर गेलेले दिसून येत आहे. विदर्भावरही सध्या दुहेरी संकट असल्याचे दिसू येत आहे. काही भागांत तापमानाचा पारा वाढलाय तर काही भागांत पावसाचा जोर वाढलाय.
advertisement
2/4
पावसाचा जोर वाढणार असल्याने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज 8 ऑक्टोबरला विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/4
या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरमध्ये आज 30 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे. उर्वरित जिल्ह्यांत पुढील 2 दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवस विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
4/4
विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच्या पावसाने आधीच नुकसान झाले आहे. आणखी त्यात भर नको, म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
पुढील 2 दिवस विदर्भासाठी महत्वाचे, पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल